संग्रामपूर प्रतिनिधी :– मध्यप्रदेशात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अकोला, अमरावती व बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या हनुमान सागर प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्याने या प्रकल्पात 65% पाणीसाठा जमा झाल्यामुळे आज दि. 18 जुलै रोजी सायंकाळी 5.45 वाजता या प्रकल्पातून वाण नदीत 4 वक्रद्वारे 50 से. मी. ने उघडून 64. 85 घ. मी./ से विसर्ग सोडण्यात आला होता. पाण्याची आवक वाढल्यामुळे त्याच रात्री पुन्हा 2 द्वारे 30 सेमी ने उघडून असे 6 वक्रद्वारे उघडून विसर्ग वाढवून 128.30 घ.मी. से. करण्यात आला असून तालुक्यातील काटेल, रिंगणवाडी, वानखेड, पातूर्डा या गावावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे ह्या गावातील पुलाची उंची वाढविण्यासाठी मागणी होत आहे. महसूल प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे या गावामध्ये सगोडा, बल्लाडी, काटेल, काकनवाडा बु, रिंगणवाडी, दुर्गादैत्य, नेकणामपूर, पातूर्डा बु., वडगाव वाण, कोलद, काकनवाडा खु., मोमीनाबाद, वानखेड, पातूर्डा खु., या 14 गावांचा समावेश असून या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
फोटो- वाण प्रकल्पाचे 6 दरवाज्यातून पाणी विसर्ग होतांना व वानखेड गावातील पुलावरून पानी वाहतांना.
अकोला अमरावती खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मेहकर विदर्भ शेगांव संग्रामपूर