खामगाव:बुलडाणा जिल्ह्यातील वारी हनुमान येथील नदीवर असलेल्या डोहात शेगाव शहराती ३० वर्षीय युवक बुडून मरण पावल्याची घटना सायंकाळी उघडकीस आली. इकबाल शाह सत्तार शाह असे मरण पावलेल्या युवकाचे नाव असून तो वाहनावर चालक म्हणून काम करतो.वारी हनुमान येथे भंडारा करण्यासाठी ट्रिप घेऊन गेला होता यावेळी त्याने आंघोळ करण्यासाठी तो वान आणि आड नदीच्या संगमा नजीक असलेल्या डोहात उतरला होता. यात तो डोहातील कपारीत अडकल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. हि बाब लक्षात आल्या नंतर नागरिकांच्या मदतीने युवकाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले यांनतर सोनाला पोलिसांच्या मदतीने वरवट बकाल येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते.सदर घटनास्थळ हे बुलढाणा जिल्ह्यात येत असल्याने त्यांनी सोनाळा पोलिसांनी याबाबत कारवाई करीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास सोनाळा पोलिस करत आहे