November 20, 2025
बुलडाणा महाराष्ट्र

वाढदिवशीच पालकमंत्री डॉ.शिगणेंनी कोरोनाबाबत घेतला आढावा

नागरिकांना 24 तास घरातच राहण्याचे केले आवाहन

बुलडाणा : रविवारी बुलडाण्यातील एका 45 वर्षीय मृत रुग्णाचा कोरोना पॉझेटीव्ह अहवाल आल्याने जिल्हा प्रशासन याबाबत काय-काय महत्वाच्या उपाय योजना करीत आहे करणार आहे याबाबत राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज 30 मार्च सोमवारी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेवून माहिती घेतली.यावेळी जिल्हाधिकारी सुमानचंद्रा,जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ ,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रेमचंद पंडित,जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, निवासी उपजिल्हाधिकारी गिरी, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बिल्हाळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी 24 तास घरात राहण्याचे नागरिकांना आवाहन केले.

आज सोमवारी 30 मार्च रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.शिगणेंचा आज वाढदिवस आहे. आपला वाढदिवस कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी साजरा न करण्याचे आवाहन करत स्वतः वाढदिवस साजरा केला नाही .उलट आजच्याच दिवशीच 45 वर्षीय मृत रुग्णाचा कोरोना पॉझेटीव्ह अहवाल आल्याने करण्यात आलेल्या व करण्यात येणाऱ्या उपाय योजना संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली यावेळी त्यांना संपूर्ण बुलडाणा शहराला लॉकडाऊन करून कोरोना पॉझेटीव्ह रुग्ण राहणाऱ्या परिसराला रेड झोन मध्ये घेवून कोरोना पॉझेटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील 50 नागरीकांना येथील स्त्री रुग्णालयामध्ये क्वारंटाईन केले आहे. त्यापैकी 24 नागरिकांना कोरोना कक्ष आयसुलेशन कक्षात दाखल करून त्यांचे नमुने घेवून नागपूरला पाठविण्यात आले आहे व या रेड झोन परिसरात नगर परिषदेच्या साहाय्याने 40 आरोग्याचे पथक स्थापन करून रेड झोन परिसरातील परिवाराची चौकशी करीत असल्याची माहिती देण्यात आली.

Related posts

चक्क ज्ञानगंगा नदीपात्रातील भूखंडावर केले अतिक्रमण

nirbhid swarajya

श्री पुंडलिक महाराज महाविद्यालयात एच. आय. व्ही.-एड्स विषयी जनजागृती व मार्गदर्शन

nirbhid swarajya

जिल्ह्यात प्राप्त 16 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 15 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!