ह.भ.प. विठ्ठल महाराज वावगे यांच्या प्रयत्नांना यश
खामगाव:नांदुरा तालुक्यातील वसाडी बु. येथील श्री महादेव संस्थानला तीर्थक्षेत्राचा (क)दर्जा प्राप्त झाला आहे.सदर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल महाराज वावगे यांनी संस्थानला क दर्जा मिळणेबाबत मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांच्याकडे मागणी केली होती.सदर संस्थानमध्ये अनेक वर्षापासून भावीक भक्त मोठ्या संख्येने येत आहेत. परंतु सुविधांअभावी त्यांची गैरसोय होत आहे. संस्थानचा विकास व भक्तांची गैरसोय टाळण्याकरीता (क) दर्जा मिळावा असे निवेदनात नमूद केले होते. नियोजन मंडळाच्या सभेत श्री. महादेव संस्थान वसाडी बु. तालुका नांदुरा या तीर्थक्षेत्राला (क) वर्ग दर्जा देण्याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.पं. जिल्हा परिषद बुलढाणा यांनी प्रस्ताव मांडला असता त्यावर चर्चा झाली व अध्यक्ष यांनी सदर प्रस्तावास मान्यता देऊन सदरील स्थळाला “क” वर्ग तिर्थक्षेत्र स्थळाचा दर्जा देण्याचा ठराव सर्वानुमते संमत केला. संस्थानला क दर्जा मिळाल्यामुळे भाविक व गावकऱ्यांमध्ये आनंद उत्सव पाहायला मिळत आहे.

