सिंदखेडराजा : एका शेतकरी पित्याने आपल्या मुलीचा विवाह कुटुंबाच्या शेतात साध्या पद्धतीने, तसेच वरवधूच्या हस्ते वृक्षारोपण करीत काल दि. १५ जून, सोमवारी पार पडला आहे. काळास अनुसरुन स्तुत्य पद्धतीने साजरा झालेल्या या विवाहाची परिसरात चर्चा होत आहे.
तालुक्यातील सावखेड तेजन येथील राजू आश्रूजी जायभाये यांची मुलगी पूजा हिचा विवाह जवळच्याच वडाळी येथील मुख्याध्यापक असलेले भगवानराव मुंढे यांचा अभियंता असलेल्या सचिन सोबत निश्चित झाला होता. कोरोनाची पार्श्वभूमी व त्यातच लॉकडाऊन मुळे विवाह शंभर व्यक्तीच्या मोजक्याच उपस्थितीत साजरा करण्याचा परिपाठ सर्वत्र आढळून येत आहे. त्यालाच अनुसरुन समाजाभिमुख नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा विचार जायभाये कुटुंबीयांनी केला. त्यातून दि. १५ जून, सोमवारी सकाळी ११ वा. नैसर्गिक वातावरणात स्वतःच्या महादेवाचे खोरे म्हणून परिचित असलेल्या जायभाये कुटुंबीयांच्या शेतात विवाह सोहळा साजरा करण्यात आला. याचवेळी वरवधूच्या हस्ते परिसरातील ओसाड जागेवर वृक्षारोपण करण्याचे समयोचित आयोजन करण्यात आले.
या विवाहासाठी वरपिता राजू जायभाये यांच्यासह कुटुंबातील अरुण लक्ष्मण जायभाये, ज्ञानेश्वर बाजीराव जायभाये, डॉ. शिवानंद जायभाये, अशोक जायभाये, अभिमान जायभाये, शेषराव जायभाये, अर्जुन जायभाये, डॉ. गणेश जायभाये, ऍड. ज्ञानेश्वर भानुदास जायभाये, विष्णू ज्ञानेश्वर जायभाये आदिंनी पुढाकार व परिश्रम घेतले.
next post