वरवट बकाल:वरवट बकाल ते शेगाव मार्गावरील खड्डडे मुळे दुचाकी अपघाताच्या संख्येत वाढ झाली असता प्रवासी गंभीर जखमी झाले असून तर काही अपघात ग्रस्त मृत्यूशी झुंज देत आहेत.खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचले असल्याने त्यांना गटारांचे स्वरुप प्राप्त झाले असून पाण्यामुळे त्या खड्यांचा अंदाज येत नसल्याने यामुळे अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.मात्र अद्यापही याची बांधकाम विभागाने दुरूस्ती केली नाही.परिणामी या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांची समस्या कायम आहे.वरवट शेगाव मार्गावर कालखेड फाट्या च्या पुढे शेगाव कडे जातांना रस्त्यावर मोठ मोठे खड्डे तर शेगाव जवळील पावर हाऊस जवळ देखील खड्डडा असून या मध्ये अनेक दुचाकी आढळून अपघात झाले आहेत.त्या मुळे सदर खड्डे हे जीवघेणे ठरत आहेत या बाबत काही सुज्ञ नागरिकांनी सबंधित राज्य महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कडे तक्रारी देखील केल्या मात्र त्यावर प्रशासनाने काही दखल घेत नसून या गंभीर बाबी कडे दुर्लक्ष केले आहे.अपघाताची मालिका सुरूच आहे.सबंधित विभागाने या रस्त्यावरील खड्डे बाबत तात्काळ उपाय योजना करण्यात याची अशी मागणी प्रवासी नागरिक करीत आहेत. वरवट बकाल या मार्गाने मी दररोज व्यवसाय च्या काम निमित्य सकाळ संध्याकाळ प्रवास करतो मार्गावरील खड्यामुळे बरेच अपघात झाले आहेत.अपघात ग्रस्तांना मी सहानुभूतीने मदत देखील केली आहे.तरी सदर खड्डे प्रशासनाने तात्काळ भुजावे जेणे करून कोणाचे प्राण वाचल अशी मागणी करतो
शिवशकर घिवे (व्यवसाहिक वरवट बकाल)
previous post