संग्रामपूर : तालुक्यात मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होवून तुरळक प्रमाणात पाऊस होवून वरवट बकाल येथे राहत्या घरावर स्पर्श करुन विज कोसळल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या महितीनुसार संग्रामपूर तालुक्यात काल १ मे रोजी तालुक्यात दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र मध्यरात्री नंतर ३.३० वाजताच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा सुटून मेघगर्जनेसह विजांचा गडागडाट सुरु होऊन संग्रामपूर शहरासह तालुक्यात काही भागात तुरळक प्रमाणात चांगलाच पाऊस झाला.त्या दरम्यान वरवट बकाल येथील आनंद स्टुडीओचे प्रल्हाद पांडूरंग अस्वार यांचे राहत्या घराचे टाॕवरवर विज कोसळली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र थोड्या प्रमाणात इमारतीचे नुकसान झाले आहे.
previous post