January 1, 2025
खामगाव गुन्हेगारी जळगांव जामोद जिल्हा नांदुरा बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ शेगांव संग्रामपूर

वरवट बकाल येथील ज्वेलर्स ची 3 दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी..चोरट्यांचे तामगाव पोलीसांपूढे आव्हान !

संग्रामपूर:- तालुक्यातील तामगाव पो स्टे च्या हद्दी मध्ये दिवसेन दिवस चोरीच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे . वरवट बकाल ता.संग्रामपूर वरवट बकाल गावात जाणाऱ्या रस्त्याला लागुन असलेले तिनही दुकाने युवराज ज्वेलर्स,प्रथमेश ज्वेलर्स ,आणि रेणुका ज्वेलर्स या तीन दुकानावर  अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी शटर वाकवुन व कटरच्या सहायाने पटटया कापुन दुकानात प्रवेश करून चोरी केल्याचा प्रकार घडला त्यामध्ये रेणुका ज्वेलर्स मधुन एक इलेक्ट्रिक वजन काटा अंदाजे किंमत ७००० रु.व चांदीचे तीन फोटो फ्रेम किंमत ३५०० रु प्रथमेश ज्वेलर्स मधुन नगदी २००० रु .व पर्समधील एक ग्रॅम सोन्याचे मनी किं.अ .५०००-रु . युवराज ज्वेलर्समधुन एक हातातील ब्रासलेट तसेच  दुकानात दुरुस्तीसाठी आलेल्या चांदीच्या तोरडया किंमत.५०००रु
असा एकूण २२५०० रु.चा मुद्देमाल माल लंपास झाला,  भरत जाधव यांनी पोस्टे तामगावला रितसत तक्रारी दाखल केल्या वरून अप,क १८०/२०२२कलम ४६१,३८० भा,द,वी,नुसार अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला,
रात्रीची पोलीस गस्त मध्ये वाढ करावी अशी मागणी जोर धरत आहे
घटनेची महिती कळताच तामगाव पो स्टे चे ठाणेदार उलमाले तसेच पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत विखे यांनी आपल्या सहकाऱ्या  सह घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेचा पंचनामा करून ठाणेदार ऊलेमाले यांच्या मार्गदर्शाखाली पुढील  तपास .दयाराम कुसुंबे करीत आहेत

Related posts

जिजाऊ स्कुल आँफ स्कालर्स मधे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेज देणार ४५००० हजार

nirbhid swarajya

नीट,जेईई परिक्षा पुढे ढकलण्यात यावी याकरिता काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन

nirbhid swarajya

काँग्रेस परिवार जळगांव जा.विधानसभा तर्फे शहिद भाकरे परिवाराला १,११,१११/- रु. ची आर्थिक मदत

nirbhid swarajya
error: Content is protected !!