जयपुर लांडे येथील घटना
खामगांव : शहर पोलिस स्टेशन हद्दित येणाऱ्या जयपुर लांडे शिवारातील शेतातील गंजिला आग लागून आगिमधे वयोवृद्ध दांम्पत्याचा जळून मृत्यु झाल्याची घटना रात्रि उशिरा उघडकिस आली.
शहर पोलिस स्टेशन हद्दित येणाऱ्या जयपुर लांडे गावानजिकच्या शेतामधे श्रीकृष्ण लांडे वय 75 व सईबाई लांडे वय 70 यांनी कापासच्या पराटीच्या गंजिला आग लाऊन यामधे आत्महत्या केल्याची घटना रात्रि 9 :30 च्या सुमारास उघड़किस आली. मिळालेल्या महितीनुसार श्रीकृष्ण लांडे व सईबाई लांडे हे रोजच्या प्रमाणे सकाळी शेतामधे काम करण्यासाठी गेले होते, रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने त्यांचा पुतण्या व मुलगा भानुदास लांडे शोधायला शेताकडे गेले असता त्यांना शेतातील कापससाच्या पराटी च्या गंजीमधे दोघेही जळलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी लगेच शहर पोलीसांना कळवले,घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशन चे ठानेदार सुनील अंबुलकर घटनास्थळी दाखल झाले होते.घटनेचा पंचनामा करुन शवविच्छेदनास पाठविण्यात आला होता. मृतक दोघेही 20 वर्षापासून आपल्या मुलांपासुन वेगळे राहत असल्याची माहिती मिळाली आहे,गंजीला आग लागून मृत्यू झाल्याचा अंदाज प्राथमिक तपासात वर्तवण्यात आला असला तरी त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली ? अद्यपहि अस्पष्ट आहे. याप्रकरणी रात्री उशिरा पर्यंतही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.अशी माहिती ठानेदार सुनील अंबुलकर यांनी दिली आहे.पुढील तपास ठानेदार अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली psi सोळंकी हे करत आहेत..