सामाजिक बांधिलकी जोपासत नंदु भट्टड व परिवाराचा उपक्रम
खामगाव : येथील सामाजिक कार्यकर्ते नंदु भट्टड यांचे वडील रमणलालजी भट्टड यांचा आज 20 एप्रिल रोजी ७९ वा वाढदिवस. यानिमित्ताने आज दुपारी कृउबास मार्केट यार्डातील प्रेम अडत दुकानासमोर कृउबास प्रशासक महेश कृपलानी व सचिव मुकुटराव भिसे यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. याठिकाणी वाटॅर कुलर लावण्यात आले आहे. यामुळे कृउबास यार्डात येणार्या शेतकरी बांधव व नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात शुद्ध थंड पाण्याने तहान भागविता येणार आहे. यावेळी व्यापारी बनवारीसेठ टिबडेवाल, दिनेश राठी, अजय खंडेलवाल, फत्तेलाल चांडक तसेच शहरातील प्रतिष्ठीत राजेंद्र भैय्या, नगरसेवक गणेश सोनोने, नगरसेवक ओम शर्मा, श्री हरी लॉन्सचे संचालक दामोदरजी पांडे, दिनेश दत्तुलालजी अग्रवाल, नंदु भट्टड, बाबु भट्टड, बबलु भट्टड, योगेश भट्टड, प्रेम भट्टड, आशिष चौकसे, मनोज खत्री, अक्षय हातेकर, मोहन राखोंडे, बाळु बानाईत, महेश देशमुख आदी उपस्थित होते. भट्टड परिवार मागील 20 वर्षांपासुन अखंडीत जलसेवा करित आहे.
स्थानिक अकोला बाजारातील निवासस्थानाजवळ पाणपोई लावुन नागरिकांची तृष्णा भागवित आहे. गेल्या 4 वर्षापुर्वी याठिकाणी सुद्धा रमणलालजी भट्टड यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वॉटर कुलर लावण्यात आले आहे. नंदु भट्टड व परिवार नेहमीच समाज कार्यात अग्रेसर असून इतर कठीण प्रसंगी तसेच परिवारातील सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात येते. मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात गावी परत जाणार्या परप्रांतीय मजुरांची दैनावस्था पाहुन त्यांना भोजन वाटप करून दिलासा देण्यात आला. तसेच शहरातील गोरगरिब व गरजुंना जिवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या काळात मुक्या जनावरांचेही भान ठेवण्यात आले. शहरात मोकाट फिरणार्या गायींना चारा देण्यात आला. कु.महक भट्टड हिच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता शहरातील दत्तगुरू मंडळ, घाटपुरी नाका व जय भवानी आखाडा, चांदमारी या दोन मंडळाना वैद्यकीय साहित्य भेट देण्यात आले.