नांदुरा : कोरोनाची दुसरी लाट शहरासोबत ग्रामीण भागातही कहर करत असून वाढती रुग्णसंख्येमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. निमगाव येथील विश्वनाथ काशीराम गावंडे यांचा मृत्यू १ मे रोजी झाला होता. ४८ तासांचा ही कालावधी उलटला नाही तर त्यांच्या तरुण विधिज्ञ मुलाचे दि.२ मे रोजी संध्याकाळी मृत्यू कोरोनाने झाला. एकाच घरातील दोघे कोरोनाचे बळी ठरल्याने पूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. निमगाव येथे विश्वनाथ काशीराम गावंडे वय ७५ वर्ष व त्यांचा मुलगा तरुण विधिज्ञ कैलास विश्वनाथ गावंडे वय ३६ या दोघांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने वडील खामगाव येथील खाजगी कोव्हिड सेंटरवर तर मुलगा कैलास हा शेगाव येथील खाजगी कोविड सेंटरवर उपचार घेत होता. दि.१ मे चा संध्याकाळी वडील विश्वनाथ काशीराम गावंडे यांची प्रकृती खालावली व त्यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांचा अंत्यसंस्कार करून घरी परतलेल्या गावंडे कुटूंबियांना मुलगा तरुण विधिज्ञ कैलास याची प्रकृती खालावल्याचे समजले व त्याचा सुद्धा कोरोनाने दि. ३ मे चा सकाळी ४८ तासांच्या आत मृत्यू झाला. आज सकाळी निमगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांपाठोपाठ तरुण विधिज्ञ मुलाचा कोरोनाने बळी घेतल्याने येथील नागरिक भयभीत व चिंताग्रस्त झाले असून सर्व गावावर शोककळा पसरली आहे. मृतक विधिज्ञ कैलास गावंडे हे नांदुरा येथील दिवाणी न्यायालयात कार्यरत होते.
next post