खामगांव : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास वंचित बहुजन आघाडी चा खामगाव तालुक्याच्या वतीने पाठिंबा केंद्र सरकारने शेतकरी विरोधात हिटलरशाही वृत्तीने जे तिंकाडे कायदे बनवले ते काळे कायदे रद्द करण्यासाठी आज 27 जानेवारी रोजी खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर किसान बाग आंदोलन करण्यात आले आहे. देशात मागील दोन महिन्यापासून कृषी कायदे विरुद्ध राजधानी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे सरकार हे लोकांसाठी असते आणि लोकशाही मध्ये लोकांना प्रथम स्थान दिलेले आहे. परंतु केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शेतकरी विरुद्ध कायदेशीर पारित केलेले आहेत सदर चे कायद्या ला विरोध म्हणून शेतकऱ्यांचे आंदोलन आला.वंचित बहुजन आघाडी तर्फे पूर्णपणे पाठिंबा यापूर्वी जाहीर केलेला आहे त्यावेळी दिल्ली येथे मागील वर्षी शाहीन बाकीचे धरतीवर खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेले आहे त्याच प्रकारे पूर्ण महाराष्ट्र मध्ये वंचित बहुजन आघाडीचे आज किसान बाग आंदोलनाचे आयोजन अॅड.बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय नेते यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे सदरचे आंदोलनाचे प्रमुख मागणीही सरकार विरुद्ध केंद्र सरकारने तीन कृषी कायदे पारित केलेले आहेत ते शेतकऱ्यांचे हिताचे असून देशासाठी नुकसान करत आहेत.त्यामुळे सरकारचे तिनेही कृषी कायदे रद्द करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या निवेदनावर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शरद वसतकार, जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी विशाखाताई सावंग, जिल्हा महासचिव अॅड. अनिल ईखारे, अंबादास वानखडे, विक्रम नितनवरे, दीपक शेगोकार,संघपाल जाधव, राजेश हेलोडे, संजय इंगळे,बाळू मोरे,दादाराव हेलोडे, युसुफ मुंसिजी, मनोज शिरसाठ, आदींच्या सह्या आहेत
