खामगांव : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 12 ऑगस्टला महाराष्ट्र राज्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली खामगांव एस. टी स्टँड येथे वंचित बहुजन आघाडी चे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या सार्वजनिक प्रवाशी वाहतुक चालु करावे या मागणीसाठी डफली बजाव आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनास यश मिळाले आहे
त्याचा जल्लोष करण्यासाठी आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी खामगांव-अकोला बसचे खामगांव एस.टी स्टँड येथे आगार व्यवस्थापक संदीप पवार तथा चालक-वाहक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत एस.टी ची वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते गणेश चौकसे यांच्या हस्ते पूजा करून एस.टी ड्रायव्हर व कंडक्टर यांचा हार घालून सत्कार करण्यात आला तसेच कार्यकर्तेनी प्रवासी यांना पेढ़े वाटून जल्लोष साजरा केला व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक विजय वानखड़े, भारिप युवा शहरअध्यक्ष राजेश हेलोडे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष शेख अंजुम,नितिन सुर्यवंशी,गौतम नाईक शहरसंघटक अमन हेलोडे,संघपाल वाकोडे, धम्मा नितनवरे,शे बब्बु,स्वप्निल दामोदर, संदिप वानखेडे, विष्णु गवई यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.