खामगाव : तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे मोठ्या प्रमाणावर राजकीय वजन आहे. आधीच्या भारिप बहुजन महासंघा कडून अशोक सोनोने यांनी दोन वेळेस विधानसभेची निवडणूक सुद्धा लढविली होती. त्या निवडणूकित त्यांनी ५० हजाराच्या जवळपास मतदान घेतले होते. राजकीयदृष्ट्या अकोला नंतर बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव मध्ये भारिप बहुजन महासंघाचे मोठ्या प्रमाणावर मतदार आहे, त्यामुळे खामगाव तालुक्याची कार्यकारिणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.
वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने खामगाव तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील प्रभाकर वरखेडे यांची तालुकाध्यक्षपदी तर नीलकंठ सोनटक्के यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामधे उपाध्यक्ष पदी अजीम खान अमान खान, शेख कडू शेख बिस्मिल्ला, शुद्धधोन इंगोले, सुनील सरदार एकनाथ हेलंगे,भारत खंडेराव,यांची निवड करण्यात आली आहे. तर महासचिव पदी नरेंद्र तायडे, कपिल अवचार, यांची नियुक्ति केली आहे. सचिव पदी राजेश तायडे ,बाळू मोरे, राजेंद्र राऊत,यांची निवड केली आहे. तर सहसंघटक पदी गजानन खोंदिल यांची निवड केली आहे. या नवीन कार्यकारणीमुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाले आहे.