खामगांव : काल २४ रोजी वंचित बहुजन महिला आघाडी च्या जिल्हाध्यक्षा विशाखा ताई सावंग यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी दिलेल्या निवेदनात अश्या मागण्या केल्या आहेत की, आपले सरकार ने ७ मे २०२१ रोजी घेतलेला शासन निर्णय हा मागासवर्गीयांच्या संविधानिक अधिकाराचे हा नाम करण्याचे असल्याने तो रद्द करण्यात यावा. कोरोना काळात बेरोजगार नागरिकांना रोजगार भत्ता देण्यात यावा. जीवनाश्यक वस्तू जसे खाद्यतेल पेट्रोल डिझेल यांच्या किमती गगनाला भिडल्या असल्याने त्या कमी करण्यात याव्या. शहरातील खाजगी रुग्णालय ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कोरूना रुग्णांना मोफत उपचार करण्यात यावा.
उज्वला गॅस योजना अनुदानावर पुन्हा सुरू करण्यात यावी. अशा विविध विषयावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार साहेब व उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. सदर निवेदन देते वेळी विशाखा सावंग जिल्हाध्यक्ष, सुमनबाई थाटे जिल्हा उपाध्यक्ष ,आरती ताई गवई जिल्हा सचिव, नीलिमा हेलोडे तालुका अध्यक्ष, रमाताई गवई जिल्हा सदस्य, विद्या पाटोळे तालुका महासचिव, यमुना हिवराळे तालुका उपाध्यक्ष, रेखा धुरंधर तालुका सचिव, छाया वाकोडे तालुका उपाध्यक्ष, ज्योती वाघ तालुका संघटक, विष्णू गवई प्रसिद्धी प्रमुख ,माधुरी वानखेडे,राजू वाकोडे तालुका सदस्य,शिवदास तायडे ,संतोष धुरंधर तालुका प्रसिद्धी प्रमुख, संजय वानखेडे ,सुरेश पाटोळे आदिची उपस्थिती होती.