नांदुरा : वंचित बहुजन आघाडी नांदुरा शाखेच्या वतीने येथिल तीन वर्षीय पीडित मुलीला ताबडतोब समाज कल्याण विभाग व बालकल्याण विभाग व मुख्यमंत्री निधि यांच्या मार्फत त्वरित मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली. व आरोपीवर कुठलीही दयामाया न दाखवता जलद गती न्यायालयात खटला दाखल करून तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली.
24 जुलै रोजी नांदुरा येथी एक निंदनिय प्रकार घडला, नैनेश लक्ष्मणदास रामचंदनी या नराधमाने नांदुरा येथील 3 वार्षिय बालिकेस उचलून झाडाझुडुपांमध्ये नेऊन अत्याचार केला व जवळील शेल्याने फाशी देऊन जीवे मारण्याच्या प्रयत्न केला.
परंतु पंचायत समिती नांदुरा येथील काही कर्मचारी यांना मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्याना 3 वर्षिय बालिकेचा रडताना दिसली व तिच्या गळ्याला फाशी देण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या लक्षात आले,व प्रसंगवधान ठेवून ते मुलीचा जीव वाचवू शकले. पीडित बालिकेला योग्य न्याय मिळावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा नांदुरा शहर व तालुक्याचा वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला,
यावेळी वंचित बहुजन आघाडी पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोकभाऊ सोनोने, जेष्ठ कार्यकर्ते भीमराव तायडे, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष राजरत्न तायडे, युवा तालुका अध्यक्ष धर्मेश तायडे , माजी शहराध्यक्ष गणेशभाऊ वानखडे, भारतीय बौद्ध महासभा ता अध्यक्ष गजानन जाधव, राजाभाऊ वाकोडे, दिलीप मेढे,अजबराव मेढे, श्रीकृष्ण इंगळे, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होतें.
previous post