पक्ष संघटनेचा घेणार आढावा
उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांचे आवाहन
खामगांव : वंचित बहूजन आघाडीच्या प्रभारी अध्यक्षा रेखाताई ठाकूर या पक्ष संघटनेच्या कार्यप्रणालीची समीक्षा करून आढावा बैठक घेणार आहेत.२७ जुलै रोजी स्थानिक पत्रकार भवन येथे होणाऱ्या या बैठकीला वंचितच्या पदाधिकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने महाराष्ट्रात जिल्हा, तालुका आणि गाव पातळी पर्यंत पक्ष संघटनेच्या कार्यप्रणालीची समीक्षा करून आढावा घेण्यासाठी व आपल्या जिल्ह्यातील पक्षाची परिस्थिती समजून घेण्यासाठी पक्षाच्या प्रभारी अध्यक्षा रेखाताई ठाकूर , महिला आघाडीच्या राज्य महासचिव डॉ .अरुंधती शिरसाट व राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी यांचा संघटन समीक्षा समन्वय व संवाद दौरा आयोजन करण्यात आला आहे.

त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखालील जिल्हा कार्यकारिणी ,तालुका व शहर कार्यकारिणी चे पदाधिकारी व सदस्य यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील पक्षाची परिस्थिती समजून घेणार आहेत. तरी घाटाखालील पक्षाच्या पदाधिकारी व सदस्यांनी या आढावा बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी केले आहे.