April 17, 2025
क्रीडा खामगाव जिल्हा बुलडाणा शिक्षण

लौकिक घिवे याचा सायक्लोथान स्पर्धेत प्रथम क्रमांक

खामगांव : रोटरी क्लब खामगांव आयोजीत सायक्लोथान 10 किमी 20 Kकिमी 40 किमी अश्या तीन प्रकारच्या स्पर्धा होत्या.त्यापैकी 10किमी स्पर्धेत लौकिक ने 24 मि 06 सेकंद इतक्या कमी वेळात प्रथम येऊन यश प्राप्त केले.त्याचा रोटरी क्लब खामगांव व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच हीरो सायकल तर्फे ट्रॉफी, प्रमाणपत्र व बक्षीस रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.लौकिक ने यापुर्वी सुद्धा शिवनेरी मॅरेथॉन स्पर्धेत त्याने नंबर पटकावला आहे. तसेच अमरावती विभागाच्या वतीने मुंबई, पुणे आदि ठिकाणी प्रतिनिधित्व करुन आला आहे.काही दिवसांपूर्वी त्याने बनवलेले मॉडल इस्त्रो ने सिलेक्ट केले आहे.लौकिक हा लॉयन्स शाळेचा विद्यार्थी असून त्याच्या शाळेकडून सुद्ध त्याचे अभिनदंन करण्यात येत आहे.लौकिक आपल्या सर्व यशाचे श्रेय आपले आई वडील व शिक्षकाना देत आहे.निर्भिड स्वराज्य कडून लौकिकचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालिस खुप खुप शुभेच्छा..

Related posts

बुलडाणा जिल्हा जाणार आता ऑरेंज झोन मध्ये

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 321 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 93 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

स्वतंत्र्य अमृत महोत्सव निमित्त जलंब येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न आयोजक अनंता नरवाडे

nirbhid swarajya
error: Content is protected !!