लोणार : लोणार या अभयारण्यात जगप्रसिद्ध सरोवर असून त्याचे वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी अकोला वन्यजीव विभागाकडे आहे करण्याच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद आहे तसेच गेल्या काही दिवसांपासून या सरोवरातील पाणी गुलाबी रंगाचे झाल्यामुळे या भागात कोणी विनापरवानगी येऊ नये यासाठी कडेकोट बंदोबस्त असताना ते परिक्षेत्रातील लोणार सरोवर वासुदेव तुळशीराम सुरळकर रा. योगेश वसंतराव सोनाग्रे रा. सोपान राजाराम थोरात रा. अटाळी हे तीन आरोपी झाडांमध्ये लपून मद्यपान करताना आढळले, या आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे 27 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास सुरू आहे. मेहकर वनपरिक्षेत्रातील वनपाल नप्ते, वनरक्षक माने, शिंदे व सरकटे यांनी ही कारवाई केली आहे.
next post