लोणार : लोणार सरोवराचा रंग लाल झाला आहे. सध्या हा चांगलाच चर्चेचा विषय ठरतो आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातले व्हिडीओ आणि फोटोही पोस्ट होत आहेत. लोणार सरोवराचा रंग लाल का झाला? यामागे नेमकं काय कारण आहे? हा लाल रंग जाऊन सरोवराला पूर्ववत स्वरुप येईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही निर्भिड स्वराज्य च्या माध्यमातून थेट लोणार येथून नेरी (नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर) चे शास्त्रज्ञ प्रमुख डॉ. कुमार, डॉ मालदुरे व खडसे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
सरोवराच्या गुलाबी लाल पाण्याबद्दल नेरी शास्त्रज्ञ डॉ. गजानन खडसे (सीनिअर प्रिंसिपल सायंटिस्ट) यांनी निर्भीड स्वराज्य सोबत बोलतांना व्यक्त केलेले मत मत
उपलब्ध संदर्भातून पाण्यामध्ये असेलेल्या साजिवांना व पाण्याच्या क्षारतेतून (सलेनिटी) त्यांना उष्णता तसेच विरघळलेल्या स्वरूपाचा ऑक्सिजन मिळाला तर तिथे पिग्मेंटेशन होऊन रंग बदलतो. जर केरोटीन सारखे पिग्मेंटेशन तयार झाले तर त्याला लाल रंग प्राप्त होतो, जर शेवाळासारखी वनस्पती असली तर त्यामध्ये क्लोरोफील मूळे हिरवा रंग प्राप्त होतो तर या ठिकाणी लाल रंगाचे पिग्मेंटेशन तयार झाल्यामुळे व यावर्षी पाण्याची पातळी कमी असल्याने व क्षार जास्त प्रमाणात असल्याने सरोवराला लाल रंग प्राप्त झाला असेल, पावसाचे पाणी आल्यानंतर पाण्याचे डायल्युशन होऊन हा रंग नाहीसा होऊ शकतो. माझ्या माहिती प्रमाणे हे घाबरण्याचे कारण नाही व या हे सरोवर जागतिक पातळीवर वारसा असल्याने याबद्दल सविस्तर अभ्यास करण्याकरिता नमुने नागपूर येथे घेऊन जाऊन सविस्तर अध्ययन करून याबद्दल चा डिटेल रिपोर्ट आपल्याला प्राप्त होईल.