November 20, 2025
जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय लोणार विदर्भ

‘लोणार’चा विषय पूर्वीपासूनच मनात; मुख्यमंत्री रमले आठवणीत

लोणार : लोणार बाबत बोलतांना, ‘मुख्यमंत्र्यांनी हा विषय फार पूर्वीपासून मनात होता’, असे सांगितले. आठवण सांगतांना ते म्हणाले की, ‘बऱ्याच वर्षांपूर्वी मी लोणार येथे आलो होतो. येथील मी काढलेले छायाचित्र माझ्या छायाचित्र प्रदर्शनात लावले होते. प्रदर्शन पहायला येणारे लोक हे लोणारच्या छायाचित्रापाशी थबकत. ते याबद्दल कुतुहलाने चौकशी करत. इथं यायचं कसं? थांबायचं कुठं अशी माहिती विचारत. त्या वेळपासूनच ह्या भागाचा विकास पर्यटनाच्या दृष्टीने झाला पाहिजे हे मनात होतं. म्हणूनच मी आज इथं आलो,असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. लोणार सरोवर संवर्धन व जतन करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ९१ कोटी २९ लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. त्यात प्रयोगशाळा व पर्यटक माहिती केंद्र, तारांगण व संग्रहालय, दुर्गा टेकडी परिसरात रस्ते,सांडपाणी, वाहनतळ व सुशोभिकरण, सरोवराजवळील सुरक्षा कक्ष, निरीक्षण तळ, प्रदूषण विरहित बसेस आदी कामे तसेच सरोवर परिसरातील पुरातन मंदिरांचे संवर्धन, शासकीय इमारतींचे नूतनीकरण, दुर्गा टेकडी येथे पर्यटक निवास बांधणे प्रस्तावित आहेत. याशिवाय ६१ कोटी रूपयांचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नगर परिषद लोणार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत राबविण्यात येणार आहे. तसेच ३ कोटी ६३ लाख रुपये खर्चून पिसाळ बाभूळ निष्कासन प्रकल्प विभागीय वनाधिकारी वन्यजीव अकोला या यंत्रणेमार्फत राबविण्यात येईल. ५४ हेक्टर क्षेत्रावर हे काम करण्यात येईल. तसेच परिसराच्या विकासासाठी आवश्यक खाजगी जमीन संपादनासाठीही १५ कोटी रुपये निधी मागणीचा प्रस्ताव आहे. एकूण लोणार सरोवर परिसराचा विकास करण्यासाठी २०५ कोटी १२ लक्ष रुपयांचा विकास आराखडा करण्यात आला असून त्यातून मंजुरी मिळालेल्या व निधी प्राप्त झालेले साडेसात कोटी रुपयांची कामे पूर्ण ही झाली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Related posts

जिल्हयात आज प्राप्त ६ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

nirbhid swarajya

बलात्कार करून फरार आरोपी 37 वर्षानंतर पकडला

nirbhid swarajya

लालपरीची धाव अविरत ; मदतीचा हात सतत

nirbhid swarajya
error: Content is protected !!