खामगावः लोखंडा येथील साई प्रकाश हॉटेल येथे आरोग्यमंत्री ना.डॉ.राजेश टोपे यांनी भेट दिली असता,बाबुरावशेठ लोखंडकार अध्यक्ष ख.विक्री.संस्था खामगाव यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवशंकर लोखंडकार,प्रसाद जाधव, विठ्ठलराव लोखंडकार, निलेशभाऊ लोखंडकार, धनंजय लोखंडकार, कल्याण गलांडे गजानन लोखंडकार व अक्षय लोखंडकार सहदेवराव गांढवे यांची उपस्थिती होती. यावेळी बाबुरावशेठ लोखंडकार, गणेशभाऊ माने यांनी खा.स्व.अंकुशराव टोपे साहेबांसोबतचे अनेक जुन्या अठवणी सांगितल्या व उजाळा मिळाल्याने मंत्री महेदय यांनी समाधान व्यक्त केले तसेच शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था मान्सून पूर्व शेतीची तयारी व ग्रामीण भागातील आरोग्य कोविड अशा अनेक विषयी शिवशंकरजी लोखंडकार यांचेशी जिव्हाळ्याने मनमोकळी चर्चा केली ह्यावेळी योग साधक श्री.कल्यणजी गलांडे यांनी सुध्दा मंत्री महोदयांशी योगाच्या विषयी अनेक पैलु व योगामुळे मानवाचे फायदे या विषयी चर्चा केली. यावेळी विठ्ठल लोखंडकार यांनी मंत्री महोदय अत्यंत व्यस्त असतांना सुध्दा भेट दिली त्याबद्दल मंत्री महेदय यांचे मनपुर्वक आभार मानले. आरोग्य मंत्री ना.डॉ.राजेश टोपे यांना महाराष्ट्र व देश कोरोनाच्या लढाई जिंकण्यासाठी ईश्वरास शक्ती देओ. या महाभयंकर संकटातून मुक्त करण्यासाठी सदिच्छा व्यक्त करुन पुढील लढाई जिंकण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.
previous post