करोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. जगात दररोज शेकडो मृत्यूमुखी पडत आहेत, तर अनेक देशांमधील शहरं लॉकडाउन झाली आहेत. अशातच सोशल मीडियावर रशियाबाबतचा एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल मेसेज:-
‘रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी देशातील जनतेला करोना व्हायरसमुळे घरातच राहण्याचं आवाहन केलंय आहे, पण लोकं ऐकण्यास तयार नाहीत, त्यामुळे त्यांनी तेथील रस्त्यांवर ८०० वाघ आणि सिंहांना मोकळं सोडलंय’. अशाप्रकारचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल मेसेज चे सत्य?:-
सोशल मीडियातील या मेसेजची सत्यता पडताळण्यात आल्यानंतर तो खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. व्हायरल होत असलेला फोटो चार वर्षांपूर्वीचा असल्याचं समोर आलं आहे. आफ्रिकेतील हा फोटो वर्ष २०१६ मध्ये सर्वप्रथम ‘डेली मेल’मध्ये छापून आला होता. भारतात करोना व्हायरसबाबत अशाप्रकारचे अनेक फेक मेसेज व्हायरल होत आहे.