खामगाव : शेतकरी-शेतमजूर,रंजल्या गांजल्यांची मनोभावे सेवा करून व त्यांनाच केंद्र बिंदू मानून आपले सामाजिक व राजकीय जीवन जनतेला अर्पण करणारे महाराष्ट्राचे लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांची जयंती 21 ऑगस्टला विविध समाजीक उपक्रमांनी साजरी केली जाणार आहे.
खामगांव मतदारसंघाचे आ.अॅड.आकाशदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनात हे उपक्रम घेण्यात येणार असून यामध्ये जयंती दिनी 21 ऑगस्टला परमपूज्य ह.भ.प. संजयजी महाराज पाचपोर यांच्या हस्ते गुप्तेश्वर आश्रम येथे दुग्ध अभिषेक करून आरती करणार आहे तसेच अटाळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना फळ वाटप व परीसरात वृक्ष लागवड होणार आहे. रोहना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी रक्तदान व वृक्ष लागवड होणार आहे. लोखनडा येथे गोरगरीब बांधवांना धान्य वाटप केले जाणार आहे. पि.राजा येथे दुग्ध अभिषेक व वृक्ष लागवड होणार आहे. तसेच भालेगाव बाजार लाखनवाडा येथे सुद्धा मंदिरात जलाभिषेक दुग्ध अभिषेक व आरती होणार आहे. यामध्ये वड, पिंपळ या झाडांची लागवड करण्यात येणारआहे. तसेच भाजपा कार्यालय खामगाव येथे सकाळी 11 वा. जयंती साजरी करून स्व.भाऊसाहेब फुंडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी रुपेश खेकळे, शिवशंकरभाऊ लोखंडकर, डॉ गोपाळ गवाळे,शांतारामभाऊ बोधे, दीपक सुलतान,धनंजय अवचार , सुरज दुबे,विनोद वेरुळकर, सुभाष सावळे, आबीत खान, रामेश्वर बंड, अंबादास हुंबरकार, प्रकाश बारगळ,आदी पदाधिकारी नियोजन करीत आहेत.तरी तालुक्यातील सर्व भाजप जिल्हापरिषद सदस्य, सभापती, उपसभापती कृउबास सभापती, संचालक, ख. वि. ज. अध्यक्ष, संचालक ,प.स. सदस्य सर्व सरपंच तालुका पदाधिकारी सर्व आघाड्यांचे पादाधिकारी, सोशल मीडिया, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, जेष्ठ कार्यकर्ते यांनी सुद्धा आपआपले कार्य क्षेत्रात लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांची जयंती शासनाचे सर्व नियम पाळुन विविध सामाजिक लोकोपयोगी उपक्रम राबवून साजरी करावी तसेच 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता भाजप कार्यालय येथे उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
previous post