आता उरल्या केवळ आठवणी !!!
खामगांव : लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या पुण्य़तिथी निमित्त भाजपा कार्यकर्त्यांचे शक्तीस्थ़ळ असलेले भाऊसाहेबांच्या समाधीस्थळी भाजप, भाजयुमो,विद्यार्थी आघाडी, युवती आघाडी,महिला आघाडी सह विविध आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. लोकनेते स्व़.भाऊसाहेब फुंडकर हे भाजपा कार्यकर्त्यांचे उर्जास्थान होते. आजही असंख्ये कार्यकर्त्यांच्या जनसामान्यांच्या तोंडून “ते आमचे भाऊसाहेब,” “वो हमारे भाऊसाहेब थे” असे ऐकायला मिळते. भाऊसाहेब हे केवळ नेते नव्हते तर ते प्रत्येक कार्यकर्त्यांच्या कुटूंबातील सदस्य़ होते, कोणासाठी मोठे भाऊ, मोठे वडील, किंवा एक चांगले मित्र होते. त्यांचे प्रत्येक जाती धर्मातील लोकांशी घरोब्याचे संबंध होते. प्रत्येकाच्या सुखदु:खात ते सहभागी होत. त्यामुळे ते केवळ राजकीय नेते नव्हते तर एक सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व़ होते. त्यांचे सर्व समाजातील व धर्मातील जनसामान्यांशी चांगले संबंध होते. त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासतांना राजकीय विरोधकांशी कधीही व्देष भावना ठेवली नाही. त्यामुळेच ते लोकनेते, बहुजनांचे नेते झाले.

अशा “भाऊसाहेबांना त्यांच्या पुण्य़तिथी निमीत्य़ अभिवादन करण्यासाठी जनसामान्य़, अतिसामान्य़ गरीब अशा सर्वच बहुजनांनी अभिवादन करीत आपली संवेदना प्रकट केल्या. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, न प गटनेते राजेंद्र धानोकार, एकनाथ पाटील, शहर महामंत्री जितेंद्र पुरोहित, शहराध्यक्ष राम मिश्रा, नगेंद्र रोहणकार, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, शहराध्यक्ष शुभम देशमुख, युवती मोर्चा शहराध्यक्ष सौ स्नेहा चौधरी, सत्यनारायण थानवी, राजेश डॉन शर्मा, यश आमले, योगेश आळशी, विक्की हटटेल, हितेश पदामगिरवार, प्रसाद एदलाबादकर, विक्की चौधरी, रमेश इंगळे, अँड मधुसुदन शर्मा, अँड दिनेश वाधवाणी, संजय भागदेवणी, मामा कांडेकर, संजय गुप्ता, गजानन मुळीक, संदीप त्रिवेदी, आकाश भडासे, विकास चौरे, विक्की रेठेकर, शशांक वक्टे, पवन ठाकूर, आशिष सुरेका, प्रतीक मुंडे, श्रीकांत जोशी, नानकसिंग चव्हाण, दीपक खिरडकर, रोहन जैस्वाल, गणेश कोमुकर, सोनू नेभवाणी, पवन झापर्डे, चंदू भाटिया, मयूर घाडगे, कल्पेश बजाज, विजय पदामगिरवार, श्री देशमुख, ऋषी कावणे, अमोल राठोड, परितोष डवरे, योगेश कोल्हे, गौरव माने, पवन तनपुरे, मोहित ठाकूर, मुन्ना पेसोडे, अभिषेक पिंपळकार, अतुल माहुरकर, निखिल सेवक, रवी चोखट, प्रवीण पानझाडे,दिपांशू भैया, आकाश मिश्रा, नितीन पोकळे, संदीप राजपूत, योगेश्वर पिंगळे, धनंजय अवचार, दिलीप सुलतान, अमित बेरोज्या, हिरल गोहेल, रुपेश शर्मा, विष्णू वाघमारे, शिवम अग्रवाल, मंगेश सावरकर, हृषीकेश पाटील, आनंद गावंडे, राहुल जाधव, मणप्रितसिंग चव्हाण, अजय रावनकर, आकाश वरणकार, आनंद आमले, आदी खामगाव शहर भाजयुमो, विद्यार्थी आघाडी, व युवती मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती युवा मोर्चा प्रसिद्धी प्रमुख विकास हटकर यांनी दिली आहे.