January 4, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय शेतकरी सामाजिक

लोकनेते स्व़.भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंती निमित्त विद्यार्थी आघाडीचा स्तुत्य़ उपक्रम

शहरात २१ जून ते २१ ऑगस्ट़ जयंती दिनापर्यंत राबविणार घरपोच मोफत वृक्ष वाटप

खामगांव : भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी व युवा मोर्चाच्या संयुक्त़ विद्यमाने लोकनेते स्व़. भाऊसाहेब फुंडकर यांची जयंती २१ ऑगस्ट़ रोजी आहे. त्यानिमीत्य़ मोफत घरपोच वृक्ष वाटप हे अभियान दि.२१ जून ते २१ ऑगस्ट़ पर्यंत राबविण्यात येणार आहे. या अभियानास आज सुरुवात झाली आहे. आज भाजपा विद्यार्थी आघाडी व युवा मोर्चाच्या संयुक्त़ विद्यमाने हा स्तुत्य़ उपक्रम राबविण्यात येत आहे.

यासाठी शहरातील ज्या नागरीकांना झाडे लावायची आहे. ज्यांच्याकडे झाडे लावण्याची जागा व व्यवस्था आहे अशा नागरीकांना भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी व युवा मोर्चा तर्फे घरपोच वृक्ष वाटप करण्यात येणार आहे. यातंर्गत आज शहरातील घाटपुरी नाका, नारायण गार्डन, संभाजी नगर, आईसाहेब मंगल कार्यालय, गोपाळ नगर, सरस्वती माता मंदीर,सिध्दीविनायक नगर या परिसरातील नागरीकांना मोफत घरपोच वृक्ष वाटप करुन या अभियानाची सुरवात करण्यात आली. लोकनेते स्व् भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनात पर्यावरण व वृक्ष संवर्धनाची अनेक कामे करण्यात आली. त्यामुळे मतदार संघातील रस्ता कामांमधून त्या परिसरातील नदी, नाले,तलाव, बंधारे यांचे खोलीकरण करण्यात आले. ज्यामुळे मोठया प्रमाणात भुगर्भातील जल साठा वाढून पाण्याची पातळी वाढली आहे. यासोबतच खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या कार्यकाळात उपरोक्त़ कामे झाली असून मतदार संघातील निम्ऩ ज्ञानगंगा हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प़ आमदार आकाश फुंडकर यांनी केवळ ४ वर्षात पुर्ण केला आहे. ज्यामुळे मतदार संघातील शेतीसोबतच इतर रान वृक्षांना देखील भरपूर प्रमाणात पाणी मिळाले त्यामुळे आपल्या मतदार संघातील तापमान जवळपास ५ डीग्री सेल्सीयस ने कमी झाल्याचे आपण अनुभवले आहे.

त्यामुळे येत्या काळात जलसंवर्धनासोबतच वृक्ष संवर्धन ही संकल्पना राबविणे आवश्य़क आहे. त्यासाठी भाजपा विद्यार्थी आघाडी व युवा मोर्चाने पुढाकार घेत मोफत घरपोच वृक्ष वाटप हे अभियान सुरु केले आहे. यावेळी परिसरातील ऋषी माहुरकर, स्वप्नील घूले, आषुतोष सायंदे यांची उपस्थिती होती. मोफत घरपोच वृक्ष अभियानासाठी नागरीकांना पवन गरड 9767923698, आशिष सुरेका 8446661103, शुभम देखमुख 3036365570, राहुल जाधव 9309993045, पवन ठाकूर 9970206038, रोशन गायकवाड 9096965570, राज पाटील 9881146565, सुपेश साखरे 8600059596 यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन पवन गरड विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड यांनी केले आहे.

Related posts

तहसीलदारांचे नगर परिषद ला पत्र

nirbhid swarajya

अमरावती जिल्ह्यातील अपघातात तिघे ठार, बुलढाण्यातील दोन युवक…

nirbhid swarajya

विदर्भ मराठवाड्यातील एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्य

nirbhid swarajya
error: Content is protected !!