April 19, 2025
जिल्हा संग्रामपूर

लॉकडाऊन मध्ये जुगारावर पोलिसांचा छापा

२७ जणांवर गुन्हा दाखल ; ५ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त

संग्रामपूर : संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊनची परिस्थिती असतांना संग्रामपूर तालुक्यात अवैध धंदे जोरात सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना मिळाल्यावरून तामगाव पो.स्टे.च्या हद्दीतील निरोड या गावात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी यांनी आपल्या पथकासह धाड टाकली असता या धाडी मध्ये १० जुगाऱ्यांना रंगेहात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रकमेसह पाच लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये जुगार अड्डा चालविणारा पंटू ऊर्फ दिपक दशरथ साबे आणि शेत मालक राजेंद्र बळीराम परमाळे यांच्यासह १७ आरोपी फरार पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

तामगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत मधील निरोड येथील गाव शिवारामध्ये जुगार अड्डा सुरू असून यामध्ये परिसरातील नागरिकांना जमवून पैशाच्या हार-जीत वर पिंटू उर्फ दिपक साबे राहणार निरोड हा व्यक्ती खेळवीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांना मिळाल्यावरून त्यांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी यांना सदर ठिकाणी धाड टाकून कारवाई करण्याचे आदेश मंगळवारी सायंकाळी दिले.

आदेश मिळाल्यावरून ठाणेदार सूर्यवंशी यांनी आपल्या पथक व पंचासह सदर ठिकाणी धाड टाकली असता तेथे २० ते २५ लोक पैशाच्या हार-जीत व जुगार खेळत असल्याचे दिसून आले. यावेळी आरोपींची धरपकड सुरू केली असता गजानन रामभाऊ सूरजने (५०) रा. रूधाना, अमोल पूरणलाल व्यवहारे (२६) शूभग गजानन घाटे (२३) रा. संग्रामपूर, सूरेश भाऊदेव भोगाळे (३४)रा. रूधाना, अतूल गोपाळ वानखडे(२१)रा. संग्रामपूर, गणेश किसन वहीतकार (४०)रा. निरोड, संतोष श्रीराम वानखडे (४०) रा. संग्रामपूर, अजय रामभाऊ जाधव (४१) रा निरोड, प्रशांत समाधान साबे (२९)रा. निरोड , उमेश मारोती पवार (४६)रा. एकलारा बानोदा यांना ताब्यात घेतले. पोलीस स्टाफ कमी असल्याने इतर आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. सदर आरोपी यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता व डावावर नगदी एकूण १९३००/- तसेच एकूण १५ नग मोबाईल वेगवेगळया कंपनीचे , एक डेजर कूलर, १५ नग गादया, एक मोटी ताडपत्री, तिन नग आडजून्या वापरत्या चटया, एक सतरंजी, एक बॅटरी, एक बल्ब, १३ नग ठंड पाण्याचे जार, गॅस सिलेडंर ,गॅस भटटा, एकूण २२ नग वेगवेगळया कपनीच्या मोटरसायकल असा एकूण ५ लाख ७८ हजार २० रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. यामध्ये जुगार अड्डा चालविणारा पंटू ऊर्फ दिपक दशरथ साबे आणि शेत मालक राजेद्र बळीराम परमाळे यांच्यासह १७ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. सदर आरोपीतांविरोधात कलम ४.५ मुजूका सहकलम २६९,२७०,२७२ ,१८८ भादवी, सहकलम ३ आपत्ती व्यवस्थापन कायदा प्रमाणे तामगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Related posts

तालुक्यातील शेतकरी सुखावला आता येणार पेरणीला वेग

nirbhid swarajya

108 रुगवाहिकेच्या चालकांचा मनमानी कारभार

nirbhid swarajya

सायबर क्राइम प्रकरण रफा दफा करण्यासाठी पैशाची मागणी ?

nirbhid swarajya
error: Content is protected !!