चिखली : महाराष्ट्रात सर्वसामान्य लोकांनवर उपासमारीची वेळ आली आहे या लॉकडाऊन मुळे महाराष्ट्रातील गोरगरिब मजूर आणि सर्वसामान्य लहान उद्योग करणारे ,हातावर काम नाही असे जवळपास सर्वच कामे ठप्प झाले आहे. त्यामुळे कष्टकरी सर्वसामान्य माणूस संकटात आला आहे. त्यामध्ये घरगुती बील वाढविण्याचा सपाटा महावितरणे लावला आहे, या लॉकडाऊनच्या परिस्थिति मध्ये आज रोजी वीज बिल भरू शकत नाही व तसेच ग्राहकांवर सुद्धा आर्थिक संकट आहे ते सुद्धा वीजबिल भरू शकत नाहीत.

या लॉकडाऊन मुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाची आर्थिक अडचण खूप वाढली आहे. महावितरणने ग्राहकांच्या विज बिल मध्ये वाढ करून एकप्रकारे ग्राहकांवर अन्याय केला आहे, त्यामुळे ग्राहकांच्या गंभीर बाबीकडे सरकारने लक्ष न दिल्यामुळे लोकजागर पार्टी चे युवक प्रदेशाध्यक्ष अंबादास गावंडे यांनी उंद्री गावामध्ये विज बिलाची होळी करून महाराष्ट्र सरकारचा निषेध केला आहे.यावेळी लोकजागर पार्टी चे गजानन गावंडे, विनायक नसवाले,दीपक जगताप, शेख न्यामद शेख यासीन, वसंता बारगळ यांच्यासह आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.