April 4, 2025
बातम्या

लॉयन्स संस्कृती उद्यान चे लोकार्पण संपन्न

खामगाव : शहरात विविध समाजसेवी संस्था अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करीत आहेत. आपल्या आपल्या क्षेत्रात काम करीत असताना लोक कल्याणकारी प्रकल्प राबवित असतात. बरीच मोठी कामे खामगावमधे झालेली आहेत. परंतु अतिशय आगळावेगळा प्रकल्पावर काम केले ते लॉयन्स क्लब संस्कृतीने. गेल्या कित्येक वर्षापासून अन्न वाटप कार्यक्रम सदैव अग्रेसर असलेले संस्कृती क्लब चे सदस्य, अन्नदान ही महादान या संकल्पनेने शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना व गरजू लोकांना अन्न वाटप निरंतर करीत आहेत. शासकीय रुग्णालय खामगाव येथे सुलभ शौचालया च्या मागच्या बाजूला सेप्टीक टॅंक व विद्युत पुरवठा च्या केबलचे जाळे व रुग्णालयाच्या परिसरातील सर्व नाल्यांचे पाणी एका ठिकाणी जमा होते तेथे खोलगट भाग असल्याकारणाने पाणी ,कचरा व साचलेली घाण प्रशासनाला वारंवार स्वच्छतेसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत होती, परंतु घाणीचे साम्राज्य कमी होईना. अशातच रुग्ण कल्याण समिती व वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून संस्कृती क्लबच्या सदस्यांनी त्या परिसरात उद्यान निर्मिती करण्याची संकल्पना बोलून दाखवली, परंतु ती गोष्ट अशक्य असल्याचे प्रथम दर्शनी सर्वांनाच वाटत होते. संस्कृती क्लबचे अध्यक्ष लॉ सुरज बि. अग्रवाल स्वतः अभियंता असल्याने व क्लबच्या ज्येष्ठ सदस्यांनी पुढाकार घेतल्याने संकल्पनेला वास्तविक रुपात साकार करण्यास वेळ लागला नाही.

अतिशय रमणीय व सुंदर आलेखन असलेले रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उद्यान अस्तित्वात आले. जवळपास सहा हजार पाचशे स्क्वेअर फुट भागात हे काम पूर्ण केले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यात बालउद्यान होणार आहे व त्याचे काम सुद्धा त्वरित पूर्ण होईल. या प्रकल्पासाठी गावातील व क्लब आणि परिसरातील दानशूर व्यक्तींनी सहकार्य केले. जवळपास दशलक्ष अंदाजपत्रकास सह असलेल्या मोठ्या प्रकल्पाचे काम क्लबने ८०% पूर्ण केले आहे यासाठी क्लबच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतलेली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पास्ट डिस्टिक गव्हर्नर लॉ. राजेश राऊत औरंगाबाद यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातील दानशूर गोयनका परिवारातील जेष्ठ समाजसेवक व उद्योजक गोवर्धनदास गोयनका हे, तर विशेष उपस्थिती मध्ये रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शंकरराव वानखेडे तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांचे हस्ते संपन्न झाला. तसेच लॉयन्स क्लबचे रिजन चेअरपर्सन लॉ इन्‍द्रपालसिंग बग्गा झोन चेअर पर्सन लॉ सुरज एम् अग्रवाल व संस्कृती क्लबचे अध्यक्ष लॉ सुरज बी.अग्रवाल व क्लबचे सर्व सदस्यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली कार्यक्रमाचे संचालन लॉ.संजय उमरकर यांनी तर आभार प्रदर्शन लॉ वीरेंद्र शहा यांनी केले.

Related posts

हा छंद जि‍वाला लावी पिसे …. ।

nirbhid swarajya

ब्राह्मणवाडा येथील जि प प्रा शाळेचा नवोपक्रम “एक मूल एक झाड”

nirbhid swarajya

Google Android O: Top Features, Release Date, Device Compatibility

admin
error: Content is protected !!