November 20, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा मनोरंजन

लॉयन्स क्लब ऑफ खामगांव सिल्व्हरसिटी वतीने भव्य लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन

खामगांव:-संपुर्ण देशभरात लोकसेवेत अग्रगण्य असलेल्या लॉयन्स क्लब च्या खामगांव येथील खामगांव सिल्व्हरसिटी लॉयन्स क्लब वतीने रविवार दि. ३ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९ते १२ वा. बुलडाणा जिल्ह्यातील कलाकारांच्या कलेला वाव आणि प्रोत्साहन देण्याकरीता भव्य लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर नृत्य स्पर्धेचे प्रमुख आकर्षक सिने अभिनेत्री प्रिया सरकटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून रिझन चेअरपर्सन लॉ. इंद्रपालसिंग बग्गा , झोन चेअर पर्सन सुरज एम. अग्रवाल यांची राहणार आहे. स्पर्धेकरीता ३०० रूपये नोंदणी फि ठेवण्यात आली असून नोंदणी फि सोबतच पाच व्हि.आय.पी. दर्शक पास मोफत देण्यात येणार आहेत तसेच इतर दर्शकांकरीता १०० रू. व्हि.आय.पी. दर्शक पास आणि सर्वसाधारण दर्शकांकरीता २५ रू. दर्शकपास असे दर ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेत प्रवेश घेण्याची अंतिम दिनांक ३१ मार्च २०२२ आहे. स्थानिक कोल्हटकर स्मारक मंदिरात ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग व्हावे असे आवाहन प्रकल्प प्रमुख लॉ. डॉ. प्रमोद झंवर ( मो. नं.९४२२८८३५४७ , लॉ. श्रीकांत सुरेका (मो. नं. ९८२२४७३४६१ ) यांचेसह अध्यक्ष लॉ. प्रकाश मुंधडा, सचिव लॉ. सुनिल भडंग, कोषाध्यक्ष लॉ. संतोष सुराणा यांनी केले आहे. अधिक माहिती करीता शुभम गायकी (मो. नं. ७४२०८९८०३८) , जय गजानन अ‍ॅक्टींग क्लासेस , काळे मार्केट समोर, घाटपुरी रोड, खामगांव यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

Related posts

संतांची मांदियाळी : विनायक महाराज शांती आश्रम ला आले यात्रेचे स्वरुप

nirbhid swarajya

अवैध रेती वाहतूक करणारे २ वाहने पकडली

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 445 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 81 पॉझिटिव्ह”

nirbhid swarajya
error: Content is protected !!