January 4, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ

लॉजमध्ये विवाहित प्रेमीयुगलाची आत्महत्या…

खामगाव: दोघेही विवाहित असतांना प्रेमसंबंध जोपासणाऱ्या प्रेमीयुगलाने आज सकाळी येथील कॉटन मार्केट समोरील आदर्श लॉजमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रेमीयुवकाने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या भावाला व्हीडीओ कॉल करून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले होते.विकास पंजाबराव सावळे वय२७ रा. कळंबी ता. बाळापूर ह.मु. इंदौर हा आज सकाळी ६ वाजेदरम्यान त्याची प्रेमिका सौ. शितल सुनिल नितोने वय २४ हिला घेवून येथील आदर्श लॉजवर आला व त्याने शितल ही त्याची पत्नी असल्याचे सांगून लॉजवर खोली घेतली. काही वेळानंतर विकासने व्हीडीओ कॉल करुन त्याच्या भावाला ‘शेवटचे पाहून घे’ असे म्हणून आत्महत्या करीत असल्याबाबत सांगितले. त्यानंतर विकास सावळे व शितल नितोने या दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. विकासचा भाऊ लॉजवर आल्यानंतर लॉजच्या खोलीचा दरवाजा तोडून पाहिले असता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेवून पंचनामा करत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून दोघांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.पुढील तपास पोलिस करीत आहेत.मृतक दोघेही होते विवाहित आत्महत्या केलेले हे दोघेही प्रेमी युगल विवाहित होते.सौ. शितल सुनिल नितोने २४ रा.नांदुरा हिला २ मुलं व १ मुलगी असून पती सुनिल हे अपंग आहेत. शितल ही मुंबई येथे पेशंट सांभाळण्याचे काम करायची तर तिचे माहेर खामगाव तालुक्यातील कंझारा आहे. तसेच मृतक विकास पंजाबराव सावळे २७ रा. कळंबी. ता. बाळापूर याला देखील दोन मुलं आहेत. तो इंदौर येथे मशीन ऑपरेटरचे काम करीत होता. त्यामुळे तो तिथेच राहायचा अशी माहिती प्राप्त झाली आहे.

Related posts

नीट,जेईई परिक्षा पुढे ढकलण्यात यावी याकरिता काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन

nirbhid swarajya

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती उत्साहात साजरी

nirbhid swarajya

खामगांव पोळ्याला गालबोट:दोन्ही गटातील ७६ जणांविरोधात गुन्हा

nirbhid swarajya
error: Content is protected !!