खामगांव : लॉकडाऊन मुळे पुणे येथे अडकलेले विद्यार्थी व काही लोकांना आपल्या घरी परत आणायला देवेंद्र देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे.कोरोनाचा संसर्ग रोकण्यासाठी २३ मार्च पासून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षण व इतर कारणासाठी मोठ्या संख्येने खामगाव, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर येथील विद्यार्थी व इतर व्यक्ती पुणे येथे गेले होते. त्यातील काही लॉकडाऊनमुळे पुणे येथे अडकलेले आहेत. त्यांना येथून परत येण्यासाठी खाजगी वाहनाचा खर्च झेपवत नसल्याने व परत येण्यासाठी पासेस मिळविण्यासाठी अडचणी सुद्धा येत आहेत. तसेच काही विद्यार्थी व नागरिकांना परत जाण्यासाठी शासनाने काही नियम व अटी शर्तींवर परवानगी दिली आहे. त्यामुळे काही विद्यार्थी व नागरिकांना परत जाण्यासाठी परवानगी मिळाली आहे. पण काही मध्यमवर्गीय घरातील विद्यार्थी व नागरिकांना आपल्या गावी येण्यासाठी अडचणी येत आहेत. तर अश्या विद्यार्थी व नागरिकांना परत आपल्या गावी आणण्यासाठी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे.
ज्या विद्यार्थी व नागरिकांना परत येण्यासाठी खाजगी वाहनाचा खर्च झेपवत नसेल, तसेंच परत येण्यासाठी पासेस मिळविण्यासाठी काही अडचणी येत असतील अश्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन देवेंद्र देशमुख यांनी केले आहे.
देवेंद्रदादा देशमुख
मो.9822699299,
दिलीप पाटील(खामगाव तालुका) 9921827212,
अविनाश वानखेडे(खामगाव शहर)
मो.9881999750,
विरेंद्र झाडोकार{संग्रामपूर)
मो.9850417259,
भगवान लाहुडकार
मो.9922485306,
श्री.शैलेश पटोकार(शेगाव)
9767777743,
श्री.संदीप उगले(जळगाव जामोद)
9822964964,
श्री.प्रदीप हेलगे(नांदुरा)
9822924983