November 20, 2025
जिल्हा

लॉकडाऊन मध्ये ही ते करतायेत गौ-सेवा

खामगाव : खामगाव येथील एकनिष्ठा फाऊंडेशन नेहमीच सामाजिक कार्यात  अग्रेसर असते. त्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित असतात. गौ सेवा, जखमी झालेल्या जनावरांवर उपचार करने, गरीब लोकांना मदत, रक्तदान करणे असेच विविध उपक्रम फाऊंडेशन च्या माध्यमातून राबवित असतात.

याच प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत आज दुपारी जिजामाता रोड, अमित देशमुख यांच्या दवाखान्याजवळ एक गाय प्रसृतिचा हुंबरडा काढत उभी होती. त्यामुळे स्थानिकांनी एकनिष्ठा फाऊंडेशन चे अध्यक्ष सूरज यादव व त्यांचे सहकारी दिनेश शर्मा, रजत भैया यांना माहिती दिली असता ते लगेचच तेथे पोहोचले व त्यांनी गाईची प्रसृती केली व तिला चारा-पाणी देऊन त्या गाईच्या मालकाचा शोधही घेतला परंतु गाईच्या मालकाचा शोध लागला नाही. लॉकडाऊन च्या काळात सर्वजण आपापल्या घरी आहेत.  पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा सर्वांचे आरोग्य जपण्यासाठी धडपडत आहेत. यांच्यासोबत च सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व मुक्या जनावरांच्या मदतीसाठी सूरज यादव, रजत भैय्या, दिनेश शर्मा यांच्यासारखे लोक प्रयत्नशील आहेत. त्यांनी केलेल्या या कार्याचे स्थानिकांकडून कौतुक होत आहे.

Related posts

शेतकरी संघटनेच्या खामगाव तालुकाध्यक्षपदी प्रफुल्ल उर्फ हेमंत मुंढे पाटील यांची नियुक्ती

nirbhid swarajya

अन्न पदार्थ व औषधी विक्री करताना सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे – पालकमंत्री

nirbhid swarajya

ग्रामपंचायत ज्ञानगंगापूर येथे अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान…

nirbhid swarajya
error: Content is protected !!