April 19, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई

लॉकडाऊन मध्ये नियम न पाळणार्‍यावर पोलीस प्रशासनाची कारवाई

खामगाव : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही सकाळी ७ ते ११ च्या दरम्यान सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. मात्र यादरम्यान अत्यावश्यक सेवा मध्ये नसलेली काही दुकाने सुरू असल्याची माहिती शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आपल्या कर्मचार्‍यांसह येथील मेन रोडवर पाहणीसाठी गेले असता अत्यावश्यक सेवा शिवाय इतर आस्थापने सुरू असल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी मेन रोडवर सुरू असलेले रीगल फुटवेअर, रूपनिखार साडी सेंटर, पंचरत्न ड्रेसेस यांच्यासह अनेक दुकान सुरु असल्याचे मिळून आले.

त्या ठिकाणी एक चप्पल व्यावसायिकांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला होता, असे तिथे उपस्थित प्रत्यक्षदर्शी काही नागरिकांनी सांगितले. मात्र पोलिसांनी त्यांना सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये आणले होते. जे व्यावसायिक नियम धाब्यावर बसवून आपल्या आस्थापना सुरू असतांना आढळले व नियमांचे उल्लंघन केलेले आढळले त्यांच्या विरोधात सुद्धा शहर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. यावेळी शहर पोलिसांनी शहरातील विविध २२ व्यावसायिकांवर आपत्ति व्यवस्थापन कायद्यानुसार कलम १८८,२६९,२७० प्रमाणे कारवाई केली आहे. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन करत असलेल्या उपायोजना नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने व स्वयंशिस्तीने सहकार्य करावे आणि विनाकारण घराबाहेर पडण्याची टाळावे असे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे. मात्र नागरिक कुठलेही नियमांचे पालन करतांना दिसून येत नाही आहे.

Related posts

चक्क डॉक्टरने दिली ऑडिओ क्लीप व्हायरल करून पत्रकारांना धमकी

nirbhid swarajya

नगरपालिकेच्या तक्रारी वरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

nirbhid swarajya

आज जिल्ह्यात प्राप्त 131 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 17 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!