चिखलीच्या जिनींग मालकाने परराज्यातील मजुरांना सांगितले घरी जायला
चिखली : बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली येथील तिरुपती जिनिंग च्या मालकाने आता कोरोना मुळे ३ महिने काम बंद असल्याचे कारण सांगत परराज्यातील मजुरांना घरी जायला सांगितलेय आणि काम नाही तर पगार हि मिळणार नाही असे सांगितल्याने जवळपास २५ ते ३० मजूर आपले साहित्य घेऊन मुलाबाळांसोबत घरी जायला पायी निघालेय. या मजुरांचा मुकादम हि यापूर्वीच घरी गेल्याने त्यानेही पायीच निघायला सांगितलेय. कोरोना मुळे चिखली च्या एमआयडीसी मधील अनेक उद्योग बंद झाले आहेत. या ठिकाणी परराज्यातील आणि इतर जिल्ह्यातील मजूर काम करतात.
मात्र आता हे उद्योग बंद झाल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तिरुपती जिनींग मालकाने आता पडत्या काळात मजुरांना सहकार्य करण्याचे सोडून त्यांना घरी जायला सांगितले आहे. तर शासनाने अशा मजुरांना आहे त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्याचे सांगितले असताना देखील या जिनिंग च्या मालकाने निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे असे म्हणावे लागेल अशी माहिती दिनेश मजूर यांनी दिली आहे.