खामगाव : येथील एमआयडीसी भागातील यश कंपनी समोर मध्ये आंदोलनाला बंदी असताना सुद्धा आंदोलन केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता जिल्ह्यातील लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दरम्यान गर्दी जमवण्यास बंदी आहे, असे असताना देखील एमआयडीसी भागातील यश कंपनी समोर काल कामगारा कडून कामबंद आंदोलन करण्यात आले होते. मात्र आंदोलनकर्ते यांना आंदोलन होई पर्यंत नेमके आपण आंदोलन कशाकरीता करत आहोत याचीच माहिती नव्हती. फक्त अध्यक्ष यांनी सांगितले की काम बंद करुन गेट वर आंदोलन करायचे आहे, आणि सर्व जणांनी आंदोलन सुरु केले. काही वेळा नंतर एका पक्षाचे नेते व पदाधिकारी या ठिकाणी आले व त्यानंतर आंदोलन नेमके कोणत्या मागणी साठी करण्यात आले हे काही कामगारांना समजले.
आंदोलनकर्ते यांच्यातील एकाने कैमेरा समोर बोलताना सांगितले की, सदर आंदोलन हे पगारवाढीच्या विरोधात सुरु आहे. मात्र काही कामगारामधे चर्चा सुरु होती कि सदर आंदोलन हे प्रदीप निमकर्डे व सचिन मोरखडे या दोघांनी कंपनीतील कामगारांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कंपनीतील कॅंटीनमध्ये सर्व कामगारांना पेपर कप मध्ये चहा व पेपर प्लेट मध्येच नाश्ता मिळावा अशी मागणी केली होती मात्र कंपनीने मागणी मान्य नाही केली या कारणावरून आंदोलन केल्याचे एका कामगाराने सांगितले. नेमके आंदोलन कशासाठी सुरु होते हेच माहित नसल्याने काल घडलेल्या या सर्व नाट्य आंदोलनाचा एकंदरीत फज्जा उडाला असल्याचे चित्र दिसून आले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सचिन मुकुंदराव मोरखडे यांच्यासह ३३ जणांविरूद्ध कलम १८८,२६९,२७० भादवी ६ कलम ५१ ब राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम तसेच साथरोग अधिनियम २ ३ ४ सहकलम कोविड-१९ अधिनियम २०२० चे नियम ११ सहकलम १३५ म.पो.का प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.