वरखेड : संपूर्ण देशांत कोरोना चा प्रादुर्भाव हा वाढत आहे.परिस्थितीती मध्ये देशांचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केला. जिल्ह्यांच्या सीमा सील केलेल्या आहेत व संपूर्ण वाहतूक बंद आहे. अशा परिस्थिती मध्ये दालंबी कोलंबी जि.अकोला येथील नांथजोगी समाजाचे २० लोक हे खामगाव जवळील वरखेड येथे अडकले असता त्यांच्या भोजनाची व्यवस्था गावकऱ्यांनी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी केली. त्यांना त्यांच्या गावी सोडण्याकरिता संपूर्ण परवानगीच्या बाबी पूर्ण करून गाडी करून त्यांना २९ मार्च २०२० रोजी सकाळी ६ वाजता आमदार आकाश फुंडकर यांच्या पत्रासह त्यांच्या गावाकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवनेरी ग्रुप यांनी रवाना केले. गावाकडे जाण्याच्या आनंदाने त्या सर्व लोकांना अश्रु अनावर झाले. निघते वेळी त्यांनी आमदार आकाश फुंडकर, संपूर्ण गावकऱ्यांचे, शिवनेरी ग्रुप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे आभार व्यक्त केले.
previous post