खामगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला. काहींची मिळकत कमी झाली असताना चक्क दिव्यांगांचे हात रोजगाराला लागल्याचे सकारात्मक चित्र खामगावमधे दिसून येत आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी शहरातील दुचाकी वाहने निःशुल्क निर्जंतुकीकरण करून देण्यासाठी दिव्यांग पंख फाउंडेशनच्यावतीने नि:शुल्क सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा पुरविण्यासाठी दिव्यांग आणि भीक मागणाऱ्या हातांच्या रोजगाराचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे समाजात अजूनही माणुसकी शिल्लक असल्याचा प्रत्यय येत आहे.समाजात आधार नसलेली मुलं आणि निराधार व्यक्ती, मूक-बधिर,अंध समाजात जागृतीसाठी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. स्वत:ला
आधाराची अपेक्षा असताना अनेकांनी स्वयं आणि इतरांच्या मदतीने रोजगाराच्या नव्या संधी शोधल्या आहेत. याहने निर्जंतुकीकरण करून देताना, कुणाकडूनही पैशांची मागणी केली जात नाही. काही नागरिक या दिव्यांगांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना स्वत:च मदत करीत आहेत.खामगाव शहरातील मुख्य रस्त्यावर दिव्यांगांनी चार-पाच ठिकाणी स्टॉल लावले आहेत. वाहने निर्जंतुकीकरण करुन देतानाच, स्वत:सह अनेक दिव्यांगांना मदत व्हावी यासाठी सॅनिटायझर आणि इतर साहित्यही स्टॉलवर विक्री साठी उपलब्ध केले आहे. दिव्यांगांना
मिलिंद मथुपवार, शकील मलंग, सपना नेमाडे, नयना मधुपवार, धनेश नेमाडे,आनंद काळणे, डॉ.अविनाश दीघे सहकार्य करीत आहेत.दिव्यांगाना कुठलाही रोजगार हवा असल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असेही त्यांनी आवाहन केले आहे.
previous post
next post