खामगांव : देशासह संपुर्ण महाराष्ट्रात कोरोना ने थैमान घातले आहे.राज्यातील तरूणांमध्ये गुटख्याचे वाढते व्यसन लक्षात घेता 2012 साली गुटखाबंदी लागू करण्यात आली. यानुसार राज्यात गुटखा विक्री आणि उत्पादनावर बंदी आली. मात्र बंदी असताना राज्यात अनेक ठिकाणी अवैद्यरित्या मोठ्या प्रमाणात गुटखाविक्री सुरुच आहे. तर एकीकडे बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव मधे लॉकडाउनचा फायदा घेत गुटखा विक्री जोरात सुरु आहे.
विशेष म्हणजे राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यात गुटखा विक्री सुरु आहे. डॉ शिंगणे यांनी पदभार घेताच जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे मारले होते व गुटखा माफ़ियांवर याचा वचक सुद्धा बसला होता. मात्र ही वचक काही दिवसापूर्ती च होती असे आज झालेल्या कारवाई वरून दिसुन येत आहे.बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहर हे गुटखा माफियांसाठी होमटाऊन म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे.
या पार्श्वभूमीवर दिनांक २९ मार्च रोजी खामगांव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथकातिल सुधाकर थोरात, रविंद्र कन्नर, देवेंद्र शेळके, प्रदीप मोठे हे आठवड़ी बाजारामधील रोड वर पायी पेट्रोलिंग करत असतांना भारत प्लास्टिक च्या मागील बाजूस नरेश नागवानी हे गुटखा विक्री करतांना दिसुन आले.ह्यावेळी पथकाने नागवानी ह्यांना 22 हजार 192 रूपयाच्या मालासह ताब्यात घेऊन अन्न व प्रशासन अधिकारी बुलडाणा यांच्या समोर हजर राहण्याचे सुचनापत्र देण्यात आले आहे.