खामगांव : सर्वकडे कोरोना चा हाहाकार सुरू आहे. यातच काही दिवसात पावसाळा येत आहे. त्यामुळे विद्युत दुरुस्ती चे कामे करणे गरजेचे आहे. हे न केल्यास पावसाळ्यात विद्यूत पुरवठा वारंवार खंडित होऊ शकतो त्यामुळे असे होऊ नये व पावसाळ्यात विद्यूत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी पिंपळगाव राजा १ व २ येथील अभि. विनायक गोतरकार व अभि. पंकज मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जनमित्र (लाइनमन) कर्मचारी यांनी मागील १५ दिवसात भर उन्हात पि.राजा व परिसरातील ३० गावांना विद्युत पुरवठा करणाऱ्या सर्व ११ के व्ही फीडर चे मेन्टेनन्स, जसे लाईन लगत च्या झाडांच्या फांद्या कापणे, इन्सुलेटर बदलणे, पोल सरळ करणे, इ. कामे या कोरोना काळात केले. जेणे करून ग्राहकांना अखंडित विद्युत पुरवठा मिळत राहो. तसेच
ग्राहकांनी विद्युत बिल ऑनलाईन भरावे असे आवाहन महावितरणाच्या लाईनमन, कर्मचाऱ्यांकडून गेले गेले आहे.