December 14, 2025
खामगाव

लॉकडाऊनमध्ये रांगोळीच्या माध्यमातून कोरोना विषाणूपासून बचावाबाबत जनजागृती

कु.रूचिता तोडकर व कु.तनया माटे यांचा स्तुत्य उपक्रम

खामगाव : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. प्रत्येक व्यक्तिला दिवसभर घरात राहून करायचे काय? असा प्रश्‍न पडला आहे. काहीजण सोशल मीडिया, वृत्तवाहिन्या, चित्रपट वाहिन्यांचा आधार मनोरंजनासाठी घेत आहेत तर काहीजण आपले सुप्त गुण प्रगट करून नागरीकांना विविध कार्यातून घरबसल्या कोरोना संसर्गाशी लढण्याबाबत जनजागृती करतांना दिसून येत आहेत. खामगाव येथील गोकुळ नगर मधील कु.रुचिता राजू तोडकर तसेच अभय नगर येथील कु. तनया अजय माटे या दोघींनी विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून त्या माध्यमातून कोरोना विषाणूबाबत बचाव कसा करावा याबाबत चित्र रेखाटून व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृतीचे कार्य केले आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे प्रत्येक नागरीकाने काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, साबण अथवा सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवावे याबाबत दोघींनी रांगोळीच्या माध्यमातून आवाहन केले आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचेे सर्व स्तरातून कौतुुक होत आहे.

Related posts

खामगांव पोळ्याला गालबोट:दोन्ही गटातील ७६ जणांविरोधात गुन्हा

nirbhid swarajya

माजी सरपंच विरिद्ध संतोष येवले विरुद्ध गुन्हा दाखल…

nirbhid swarajya

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

nirbhid swarajya
error: Content is protected !!