खामगाव : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाउन सुरू आहे अश्यातच उन्हाळ्याची सुरवात झालेली असून एकीकडे यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असला तरीही दुसरीकडे काही भागातील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचे टँकर घेण्यासाठी शिल्लक पैसे मोजावे लागत आहेत.
खामगाव शहरातील काही भागात अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना लोकडाऊन मध्येही पाण्यासाठी घराच्या बाहेर पडावे लागत आहे. काही नागरिकांना पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहे . मात्र लॉकडाउन मुळे वाहतूक बंद असल्याने पानी टँकर च्या किंमती मध्ये अधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. टँकरच्या मागणीत वाढ होत असल्याने याचाच फायदा अनेक टँकर मालक घेत किंमतीत वाढ करत आहेत. ५ हजार लिटर पाण्याचा टँकर हजार ते पंधराशे रुपये मोजून पाणी विकत घ्यावे लागत असल्याने कुटुंबाचे अर्थिक गणित बिघडत आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.