November 20, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ शेगांव सामाजिक

लीनेस क्लब व जेसीआई आणि सुरभी सेवा संस्था तर्फे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन…

तज्ञ डॉक्टरांनी केली रुग्णांची तपासणी..
अनेक रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ

खामगाव :लीनेस क्लब व जेसीआई ग्रुप नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतो.लीनेस क्लब,जेसीआई ग्रुप नेहमीच खामगाव शहरात विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम राबवित असतात आज ग्रुप तफ्रे शेगांव तालुक्यातील जलंब येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले या शिबीराला खामगाव येथील डॉ सम्राट मानकर,डॉ, राहुल खंडारे,डॉ दीपक तारळेकर,डॉ गौरव ठाकरे,डॉ चेतन सटोटे,डॉ संस्कृती मेंढे,डॉ विकास चरखे,डॉ प्रभाकर दाणे,डॉ सौ शुभांगी दाणे,डॉ सौ अर्चना भोपळे आरोग्य शिबिराला डॉक्टर उपस्थितीत होते.या तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.रूग्णांना मोफत औषध देण्यात आली.शिबिराचा गावकऱ्यांनी,रुग्णांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. शिबिराची सुरुवातीला उपस्थितीत मान्यवर मंडळी व डॉक्टरांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.लीनेस क्लब व जेसीआई चे अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले शिबिर यशस्वी करण्यासाठी लीनेस क्लब,जेसीआई सुरबी सेवा संस्था च्या सदस्यां
हरप्रीत बग्गा,शीतल गोयनका,सचिव-सोनल बुद्धदेव,निर्मलाजी जैन,डॉ.अपर्णा भावस्कर,चेतना पाटील,सीमा चोप्रा,प्रो-मनिषा जैन जेसीआई अध्यक्ष-सुयोग झंवर,समन्वयक-कुणाल राठी
सहसंयोजक-साकेत गोयनका,अमरजीतसिंग बग्गा,संकेत नावंदर,विनम्र पगारिया,चेतना पाटील,धीरज बोरीकर,सोनल बुद्धदेव यांनी परिश्रम घेतले….

Related posts

भर उन्हाळ्यात पुर्णा नदित सोडण्यात आले पाणी…

nirbhid swarajya

युवकांनी वाचविले हरिणीच्या पिल्लाचे प्राण

nirbhid swarajya

जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत जाहीर

nirbhid swarajya
error: Content is protected !!