November 21, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा शेतकरी

लिकासन ट्रेडर्सचा परवाना रद्द

खामगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कमलकिशोर बन्सीलाल धुत यांच्या लिकासन ट्रेडर्सचा परवाना रद्द करण्यात आला आहे. याबाबतचा अंतीम आदेश सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खामगाव यांनी २० जुलै रोजी दिला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक यांनी १९ सप्टेंबर २०१९ च्या आदेशानुसार कमलकिशोर घुत यांच्या नावाने धारण करण्यात आलेल्या अडत परवाना शर्तीचा भंग केल्यामुळे महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियमानुसार रद्द केला होता, त्यामुळे धुत यांनी अपील दाखल केले होते. या अनुषंगाने बाजार समिती व धुत यांचे म्हणणे ऐकुण घेण्यासाठी ११ ऑक्टोबर २०१९, १५ नोव्हेंबर २०१९ व २१ नोव्हेंबर २०१९ रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती.


सदर सुनावणी दरम्यान कमलकिशोर घुत व त्यांचे वतीने अॅड.एन.बी.घुत तसेच बाजार समितीतर्फे सचिव एम.एस.भिसे यांनी तोंडी व लेखी म्हणणे सादर केले.त्यानुसार धुत यांनी अडत व्यवसायासंबंधी हिशोबपट्टी व बिले सादर केल्याचे सांगितले. परंतु चौकशी करता संपूर्ण रेकॉर्ड दिले नसल्याचेही सांगितले. याबाबत पुत यांना संधी देण्यात आली होती. मात्र त्यांनी रेकॉर्ड सादर केले नाही. त्यामुळे सचिव यांनी लिकासनचा परवाना रद्द करण्याबाबत विनंती केली असता, महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम १९६९ मधील कलम ९ व नियमातील तरतुदी नुसार येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ओ.एस.साळुके यांनी लिकासन ट्रेडर्सचा परवाना निलंबीत केला आहे.यामुळे अडत परवाना धारकांचे धाबे दणानले आहेत.

Related posts

कधी थांबेल हा भेदभाव…?

nirbhid swarajya

टिळक पुतळ्या जवळील 3 दुकानामधे चोरी..

nirbhid swarajya

जलंब येथे आरोग्य शिबीराचे आयोजन

nirbhid swarajya
error: Content is protected !!