खामगाव : येथील विश्वकर्मा सिल्वर हाऊसचे कारखान्यातील कारागिराने दोन किलो चांदी घेऊन फरार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत विश्वकर्मा सिल्वर हाऊसचे संचालक राहुल कमल जांगिड यांनी शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विश्र्वकर्मा सिल्वर हाऊस यांचे आशीर्वाद निवास जांगिड हाऊस कॉटन मार्केट जवळ कारखाना आहे, त्या कारखान्यांमध्ये चांदीच्या दागिन्यांचे व निरनिराळ्या प्रकारच्या वस्तूंचे काम होत असते. याठिकाणी असलेल्या कारागीराकडे चांदीचे भांडे व दागिने दिले होते. दिलेल्या स्टॉक पैकी आरोपी गौतम दास कनाई रा. मुर्शिदाबाद पश्चिम बंगाल याने दोन किलो चांदी किंमत १ लाख ३० हजार घेऊन फरार झाला आहे.
याप्रकरणी राहुल जांगिड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गौतम दास कनाई विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खामगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे हे करीत आहे.