November 20, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

लाखोचा प्रतिबंधीत गुटखा जप्त ; खामगांव शहर पोलीसांची कार्यवाही

खामगांव : शहर पोलिसांनी नांदुरा रोड वरील सुटाळा खुर्द जवळ गुटखा जप्त केला आहे मिळालेल्या माहितीनुसार खामगांव शहर पोलीसांना गुप्त खबर मिळाली की, नांदुरा रोडने खामगांव शहराकडे एक पांढऱ्या रंगाच्या i-२० गाडी क्र.एमएच १८- डब्ल्यू-३९२४ मध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा विक्रीसाठी नेण्यात येत आहे अशी माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे खामगाव शहर पोलिसांच्या पथकाने नांदुरा रोडवरील सुटाळा खुर्द स्टॉप येथे नाकाबंदी करुन सदर वाहनास थांबविले असता त्यामध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व मुद्येमाल मिळुन आला.ज्यामधे त्यांच्या ताब्यातील वाहनांमधुन वाह सुगंधीत पान मसाला असे 500 पॉकीट किंमत प्रत्येकी पॉकीट 120/- रुपये प्रमाणे एकुण 60,000/- रुपये, W Chewing Tabacco न्यु पॅक असे 500 पॉकीट किंमत प्रत्येकी पॉकीट 15/- रुपये प्रमाणे एकुण 7,500/- रुपये, केसरयुक्त विमल पान मसाला 22 पाऊच 100 पॉकीट किंमत प्रत्येकी पॉकीट 187/- रुपये प्रमाणे एकुण 18,700/- रुपये, V-1 तंबाखु 22 पाऊच 100 पॉकीट किंमत प्रत्येकी पॉकीट 33/- रुपये प्रमाणे एकुण 3,300/- रुपये, एक व्हिवो कंपनीचा मोबाईल किंमती 15,000/- रुपये, एक पोको कंपनीचा मोबाईल किंमती 7,000/- रुपये, एक पांढऱ्या रंगाची i-२० गाडी किंमत अंदाजे 1,50,000/- रुपये. असा एकुण 2,61,500/- रुपयाचा मुद्येमाल मिळून आला. या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालक अब्दुल रज्जाक अब्दुल मजीद वय 26 वर्ष रा.फाटकपुरा, खामगांव व साबीर अशरफभाई नगरीया वय 29 वर्श रा. टिळक मैदान मोची गल्ली, खामगांव अश्या दोन आरोपींना अटक केले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही अरविंद चावरिया पोलीस अधिक्षक, बुलडाणा, श्रवण दत्त. एस अपर पोलीस अधिक्षक खामगांव, अमोल कोळी उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगांव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सुरेश नाईकनवरे, पोउपनि. पंकज सपकाळे, सफो बळीराम वरखेडे, नापोकाँ दिनेशसिंग इंगळे, नापोकाँ गजानन काकडे, नापोकाँ संतोष वाघ, पोकाँ दिपक राठोड, पोकॉ प्रफुल टेकाळे, पोकॉ जितेश हिवाळे, पोकॉ अमरदिपसिंह ठाकुर,
पोकाँ अनंता डुकरे यांनी केली आहे.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 301 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 51 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायकराव मेटे साहेब यांचे अपघाती निधन

nirbhid swarajya

ओम ऑप्टिकल्स द्वारे सोशल डिस्टनसिंग बाबत जनजागृती

nirbhid swarajya
error: Content is protected !!