SDPO :- अमोल कोळी साहेब यांनी उत्सव आनंदाने व शांततेने साजरा करण्याचे केले आवाहन
लाखनवाडा:- (कृष्णा चौधरी) खामगांव तालुक्यातील हिरवखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये लाखनवाडा हे मोठे गाव असून गावामध्ये विविध जाती धर्म पंथची लोक राहतात.या अनुषगाने गावामध्ये शांतता प्रस्थापित राहावी यासाठी पोलिस अधिकारी यांच्या वतीने गणपती विसर्जन मंडळाने शांततापूर्ण पद्धतीने विसर्जन करावे.यासाठी आज उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लाखनवाडा येथे शांतता समितीची बैठक घेण्यात आली .यामध्ये हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिक व मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी ठाणेदार गजानन वाघ, सरपंच सौ सुनीता खंडारे, गावातील नागरिक गणी काझी, संताराम तायडे, शिवाजी पांढरे, अजीम खान,डॉ गुफरानउल्ला खान , उपसरपंच प्रकाश इंगळे, विलास वानखडे,नवल पांढरे, डॉ. तौशिफ, ॲड देविदास वाकोडे, सोपियान उल्ला खान, इद्रिस खान, पोलिस पाटील राजू पांढरे,या वेळी उपस्थित होते.सर्वांनी गणेश उत्सव व विसर्जन शांततापूर्ण पद्धतीने करावे असे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी पत्रकार बांधव व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नेहरू युवा केंद्र समन्वयक सुमित वाकोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन पवार साहेब यांनी केले.