November 20, 2025
खामगाव बातम्या बुलडाणा

लाखनवाडा पशु आरोग्य शिबीर आयोजित

डॉ. प्रवीण शिंदे यांनी रूजू होताच गावातील जनावरे व पशु पालकांसाठी सुरू केल्या नवीन सुविधा…..

खामगांव(कृष्णा चौधरी )तालुक्यातील लाखनवाडा येथे पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी १ येथे गावातील पशु व जनावरे यांच्या साठी पावसाळा तोंडावर आल्याने जनावरासाठी लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण मध्ये पशुचे जंतू निर्मूलन,गोचीड निर्मूलन,जनावरचे वंधत्व निर्मूलन,संबंधी जनावरचे लसीकरण करण्यात आले. या प्रसंगी गावातील सरपंच शे.अफरोज शे. युसुफ उपस्थित होते. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण शिंदे यांनी जनावरांचे आरोग्य शिबीर मध्ये लसीकरण करून पशु पालक यांना जनावरची काळजी व नीगा राखणे यासाठी पशु पालकांना माहिती दिली.या लसीकरण मध्ये टी. पी. पांढरे, परिचर,व पशुसेवक गोविंद चव्हाण,प्रकाश ढोपे, नेहरू युवा केंद्र समन्वयक तथा पत्रकार सुमित वाकोडे लसीकरण साठी उपस्थित होते.गावातील नागरिक यांनी सदरील पशु आरोग्य शिबिरामध्ये आपली जनावरे आणून लसीकरण करू घेतले.६३ नागरिकांनी आपल्या, बकरी , गाई, बैल, म्हैस ईतर ३०० जनावराचे लसीकरण करून पशु पालक याना औषधीचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

कोरोनाचा संदेश देत कावड धारी शहरात दाखल

nirbhid swarajya

निशब्द केल भाऊ…..

nirbhid swarajya

बुलढाणा तालुक्यातील हतेडी खुर्द गावात आढळले दोन मृतदेह

nirbhid swarajya
error: Content is protected !!