January 1, 2025
खामगाव बातम्या बुलडाणा शेतकरी

लाखनवाडा परिसरात भुईमुग काढणीला वेग

लाखनवाडा: श्रीकृष्ण चौधरी खामगाव तालुक्यातील लाखनवाडा परिसरामध्ये शेतकऱ्यांनी आता खरिपाच्या हंगामाला सुरवात केली असून शेतीच्या कामाला प्रचंड वेग आला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात जल साठा असल्यामुळे येथील बागायती शेती चे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरात तोरणा कालवा, फतेपुर व रायधर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलसाठा असल्यामुळे शेतकऱ्यांनी या खरिपाच्या हंगामा मध्ये भुईमुग व कांदा या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते

मात्र शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या. मजुराचा प्रचंड ताण निर्माण होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच गोष्टी मजूर न मिळण्याच्या अभावामुळे घरी कराव्या लागतात.या वर्षी उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे भुईमुगाच्या व कांद्याच्या पिकावर प्रचंड ताण आल्यामुळे व सतत होणाऱ्या वातावरणातील बदला मुळे उत्पादनामध्ये घट येत असल्याची चर्चा शेतकरी करत आहे. त्यातच आता पावसाळ्याचे दिवस जवळ येत असल्यामुळे शेतीची कामे पटक उरकून शेती तयार करावी लागत आहे.अशातच बळीराजा आपल्या शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 512 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 196 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

डॉक्टराने दिला विठ्ठलाला प्रसाद..

nirbhid swarajya

तात्पुरते कारागृहातून फरार आरोपीला पोलिसांनी केली अटक

nirbhid swarajya
error: Content is protected !!