खामगांव : लाखनवाडा येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये भारतीय स्टेट बँकेचे सर्विस मॅनेजर सौरभ बागडे अनेक दिवसापासून येथील शाखेमध्ये कार्यरत होते. अत्यंत संयमी असलेले कर्मचारी म्हणून त्यांची या शाखेमध्ये ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे लाखनवाडा ग्रामवासी भावनिक झाल्याचे दिसून आले. त्यांच्या निरोप समारंभ ग्रामस्थांकडून बँके मध्ये आयोजित करण्यात आला होता.

यावेळी यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक सारंग ठाकरे, निलेश उगले, सचिन ठाकूर तसेच बँकेचे सुरक्षा प्रतिनिधी केशव धुमाळे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष शेख युनूस शेख युसुफ, अमोल भोळणकर, जावेद खान, गजानन देशमुख, मो जाबीर, महादेव निमसे यांच्यासह लाखनवाडा ग्रामस्थ उपस्थित होते.